168 ग्रॅम एमडी पावडरसह आरोपीला अटक

*4 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
भद्रावती, 
md-powder : स्थानिक गुन्हे शाखेने 168.94 ग्राम एमडी पावडरसह एकूण 14 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर-भद्रावती मार्गावरील हॉटेल जमघट समोर करण्यात आली.
 
 
 
j
 
 
 
गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमडी पावडरची विक्री करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर-भद्रावती मार्गावरील हॉटेल जमघट समोर सापळा रचला. मध्यरात्री 12.35 वाजताच्या सुमारास एक चारचाकी वाहन (एमएच 49 एफ 1569) येताना दिसले. पोलिसांनी त्या वाहनाला थांबवित झडती घेतली असता, त्यामध्ये 168.94 ग्राम एमडी मेफेड्रोन पावडर आढळून आला. या कारवाईत 8 लाख 50 हजार रुपये किंमतीचा एमडी पावडर, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण 14 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी चालक 40 वर्षीय अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार (40, रा. तुकडोजी चौक, नागपूर) यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात भद्रावती पोलिस ठाण्यात कलम 8 (क, 22 (क), 29 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 छऊझड अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले व सुनील गौरकार, पोलिस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.