बोर प्रकल्पाची कोअर सफारी १ जुलैपासून बंद

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
वर्धा,
bor project सेलू तालक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प विदर्भासह विदर्भाबाहेरील पर्यटकांना भुरळ घालतो. हा व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी उपयुत ठरत आहे. सध्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राच्या जंगल सफारीदरम्यान बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघीण व तिच्या पिलांचे दर्शन पर्यटकांना होत आहे. अशा या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राच्या जंगल सफारीचे गेट मान्सून कालावधीमुळे १ जुलैपासून बंद करण्यात येणार आहे.
 

बोर  
 
 
बोर व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र १३ हजार ८०० हेटर तर बफर क्षेत्र ६७ हजार ८१४.४६ हेटर इतके आहे. या प्रकल्पाला २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. त्यावेळी हा व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जायचा. पण बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचे एकसंघ नियंत्रण झाल्यावर बोर व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प राहिला नाही. सन २०२४-२५ च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार बोर व्याघ्र प्रकल्पात १४ वाघ, सुमारे ६४ बिबट, ४० हून अधिक अस्वल तसेच अन्य विविध वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राप्रमाणेच आता बोरच्या बफर क्षेत्रातही जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे. कोअर क्षेत्रातील जंगल सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार असली तरी बफर क्षेत्रातील जंगल सफारी बाराही महिने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
बफरमध्येही वाघांचा अधिवास
वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशनच्या तज्ज्ञांनी नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार बोर व्याघ्र प्रकल्पात १४ वाघ आहेत. यात सहा नर तर ७ मादी व एक सेस अनआयडेंटीफाईड वाघाचा समावेश आहे.bor project या १४ वाघांपैकी ७ पट्टेदार वाघांचा कोअर तर ७ वाघांचा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात अधिवास असल्याचे देहरादून येथील तज्ज्ञांनी केलेल्या निरीक्षणात पुढे आले आहे.
कोअर-बफरमध्ये ६४ बिबट
जैवविविधतेने नटलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात ६४ बिबट्यांचा अधिवास आहे. त्यापैकी २८ बिबट कोअर तर २७ बिबट्यांचा बफर क्षेत्रात अधिवास आहे. तर ९ बिबट्यांचा कोअर व बफर या दोन्ही क्षेत्रात अधिवास असल्याचे सन २०२४-२५ मध्ये करण्यात आलेल्या गणनेत पुढे आले आहे.