प्राणघातक हल्ला प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
वाशीम, 
fatal-attack-incident : वाशीम शहरात १ जून रोजी घडलेल्या हाणामारीच्या आणि प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात २ जून रोजी रात्री उशिरा मुख्य सूत्रधारासह आरोपींची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आाला.
 
 
jk
 
 
 
पोलिस सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार राजेश प्रल्हाद राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख बाबर शेख अकबर (वय ३५ ) रा. अल्लाडा प्लॉट वाशीम याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शेख ख्वाजा शेख हनिफ (वय ३५), शेख जावेद शेख रजाक (वय ३०), शेख पप्पु शेख हारुन (वय २५) आणि शेख रफिक (वय ३०) या सर्वांचा समावेश आहे. याशिवाय आणखी काही अनोळखी महिला आणि पुरुषांचा या हल्ल्यात सहभाग घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ जून रोजी रात्री उशिरापर्यंत फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्यामुळे एफआयआर नोंदवण्यास विलंब झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून राजेश राऊत, प्रविण राऊत, प्रतीक राऊत आणि अंकुश सोनटक्के यांना लोखंडी पाईप आणि लाकडी दांडयाने बेदम मारहाण केली.
 
 
या प्रकरणी वाशीम शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११८ (२), ११५ (२), १८९(२), १९०, १९१(२), २९६, ३५१ (२) आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशीम शहर पोलिस करीत आहेत.