वर्धा,
corrupt-municipal-council-engineer : वर्धा शहरातील सायकल ट्रॅकसह अन्य बाबी नगर पालिकेत गाजत आहेत. अनेक फायली अडकून असल्याची चर्चा जोर पकडूनच असताना काल २ रोजी रात्री नगर पालिका अभियंत्याला २ लाखाची लाच घेताना रंगेहात अटक केली. परंतु, याचा सुत्रधार कोण हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. घटना घडताच नगर पालिकेतील एका अधिकार्याने नगर पालिकेतून पळ काढल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान, आज बुधवारी अभियंता डोईजड याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली.
एसीबीच्या कारवाईत नप येथील बांधकाम विभागाचे अभियंता संदीप डोईजड याला दोन लाखाची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. शहरातील विकास कामाच्या देयकाचे इस्टिमेट तयार करण्यासाठी लाच मागितली होती. पण, ठेकेदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचून मंगळवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली. नागपूर पासिंग असलेल्या कारने एसीबीचे अधिकारी वर्धा नगरपालिका परिसरात दाखल झाले होते.
आज सकाळपासुन नगर पालिकेत फाईलींची धावपळ सुरू झाली होती. या घटनेने लोकप्रतिधिनी आणि नप मुख्याधिकार्यांचे धाबे दणानले आहे.