कर्नाटकात डी. के. युगाची सुरुवात; शिवकुमार मुख्यमंत्रीपदी

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
बंगळुरू,
Dawn of the D.K. Era in Karnataka कर्नाटकच्या राजकारणात मोठा बदल घडला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. राजधानी बेंगळुरूमध्ये झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या नेतृत्वबदलामुळे राज्यात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे. शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लि खडगे , राहुल गांधीतसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री Siddaramaiah यांनीही शिवकुमार यांचे अभिनंदन करत नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.
 
 

डी. के. शिवकुमार
 
नव्या सरकारमध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते जी. परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनीही पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात विविध विभागांचा अनुभव असलेल्या नेत्यांना संधी देण्यात आली असून सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नव्या मंत्रिमंडळात के. एच. मुनियप्पा, के. जी. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी, कृष्णा बायरेगौडा, प्रियांक खर्गे, यू. टी. खादर, ईश्वर खंड्रे, यतींद्र सिद्धरामय्या, बायराथी सुरेश आणि शरण प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांतील अनुभव लक्षात घेऊन या नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत.
 
 
अलीकडेच पक्ष नेतृत्वाच्या निर्णयानुसार सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नव्या नेतृत्वासाठी डी. के. शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनेक वर्षांपासून पक्ष संघटना आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शिवकुमार यांच्याकडे आता राज्याच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदची शपथ घेतल्यानंतर शिवकुमार यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यासमोर अनेक आव्हाने असल्याचे मान्य करत त्यांनी पारदर्शक प्रशासन, विकासकामांना गती, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील या नेतृत्वबदलामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळात नव्या सरकारच्या निर्णयांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.