समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने केले नको ते 'कृत्य'

व्हिडीओमागचे सत्य काय

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
मुंबई
Samay Raina स्टँडअप कॉमेडियन समय रैना आणि यूट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सध्या या दोघांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामध्ये दोघे आयपीएल सामना पाहताना एकमेकांना ‘लिप किस’ करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडीओमागील सत्य समोर काय आहे?. हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेला डिपफेक व्हिडीओ आहे का याची पुष्टी बाकी आहे
 

Samay Raina 
‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोमुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांची नावे काही महिन्यांपूर्वी मोठ्या वादात सापडली होती. शोमधील एका वक्तव्यामुळे देशभरातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर दोघांनीही काही काळ सार्वजनिक कार्यक्रम आणि सोशल मीडिया उपस्थिती मर्यादित ठेवली होती. आता पुन्हा एकदा ते विविध कार्यक्रमांमध्ये दिसू लागले असतानाच हा व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हायरल झालेल्या Samay Raina व्हिडीओमध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामना सुरू असताना कॅमेरा त्यांच्याकडे वळतो. त्यानंतर दोघेही कॅमेराकडे पाहत हाताने हृदयाचा आकार तयार करतात आणि पुढे एकमेकांना ‘लिप किस’ करताना दिसतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी दोघांमधील मैत्री आणि केमिस्ट्रीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, तर अनेकांनी व्हिडीओच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे हा व्हिडीओ खरा की बनावट, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.