पुलगाव,
digambar-jain-mahasamiti : श्री दिगंबर जैन महासमिती महाराष्ट्र अंचलच्या वतीने रविवार ३१ मे रोजी पुलगाव येथील श्री १००८ मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात दिगंबर जैन समाजाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंचलचे अध्यक्ष सुनील पेंढारी होते. पेंढारी यांनी समितीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अॅड. चैतन्य आग्रेकर यांनी सदस्यत्व प्रक्रियेची तांत्रिक माहिती दिली. प्रवते विनय सावळकर यांनी महासमितीद्वारे चालवल्या जाणार्या विविध राष्ट्रीय व प्रांतीय कार्यक्रमांची माहिती दिली. संघटन मंत्री डॉ. दीपक शेंडेकर यांनी महासमितीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पुलगाव संभागाच्या नवीन पदाधिकार्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात अध्यक्ष : किशोर चाणेकर, सचिव : अशोक काळे, कोषाध्यक्ष : शैलेश बनौरे, युवा आघाडी अध्यक्ष : पीयुष पोहरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संचालन आणि प्रास्ताविक विजय उदापूरकर यांनी केले. सभेच्या शेवटी, समाजातील महिलांना मुलांसाठी जैन संस्कार पाठशाला सुरू करण्याचा आग्रह करण्यात आला. सुषमा बनौरे यांनी आभार मानले.