श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
नागपूर,
district-wise-survey : जिल्ह्याचा विकास झाला तरच राज्याचा विकास होईल, विकसित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आर्थिक व सामाजिक निर्देशांक विकसित करणे आवश्यक आहे. या दृष्टीने श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणासाठीच्या प्रशिक्षण वर्गाचे पश्चिम क्षेत्राच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे उप महानिर्देशक श्रीनिवास उप्पला यांच्या हस्ते झाले.
 
 
shrama-shakti-one
 
 
वनामती येथील सभागृहात नियोजन विभाग तसेच अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे विशेष आयुक्त कृष्णा फिरके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाणे, अतिरिक्त आयुक्त दिनेश सहआयुक्त सुशील आग्रेकर, सहआयुक्त संध्या गवई, सेवानिवृत्त अप्पर महानिर्देशक अशोक कुमार टोपराणी, सहाय्यक संचालक सुनील वैरागडे, आयपीएसओएस या संस्थेच्या संचालिका तृप्ती शर्मा होत्या.
 
विकसित भारत २०४७ याप्रमाणेच विकसित महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी अचूक व अद्यावत माहिती आवश्यक आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नियतकालीन श्रमशक्ती सर्वेक्षण तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नावर राज्य व जिल्हा उत्पन्न तसेच इतर सामाजिक व आर्थिक निर्देशक परिगणित करण्यात येतात, यावरून व राज्याच्या विकासाबाबतचे धोरणे ठरवून योजनांची आखणी करण्यात येते. मात्र आता ही परिभाषा बदलली आहे. जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू ठरुन जिल्ह्याचा विकास झाल्यास राज्याचा विकास होईल, त्यासाठी जिल्हास्तरावर निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमहा निदेशक श्रीनिवास उप्पला यांनी यावेळी केले.
 
श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे निर्माण होणारी सांख्यिकीय माहिती व विविध निर्देशांकाद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास मदत होणार आहे. शासनाच्या विविध योजना आखण्यासोबतच क्षेत्रातील धोरणे निश्चित करण्यात या सर्वेक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व असल्याचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे विशेष आयुक्त कृष्णा फिरके यांनी यावेळी सांगितले.
 
नागपूर व अमरावती विभागासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवस चालणार्‍या या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. या सर्वेक्षणांतर्गत एकूण ६८२८ इतके नमुना घटक असून २७६ अन्वेषक व निरीक्षक यांच्याद्वारे काम राज्यात पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर व अमरावती विभागात या दोन्ही सर्वेक्षणासाठी शहरी आणि भाग मिळून एकूण १७७४ नमुना घटकांचे सर्वेक्षण होणार आहे.
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमल किशोर फुटाणे यांनी श्रमशक्ती सर्वेक्षण असंघटित क्षेत्रातील उद्योगाचे वार्षिक सर्वेक्षण ही महत्त्वाचे सर्वेक्षण असून सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्राप्त होणारी ग्रामपातळीवर जिल्हा आणि विभागीय स्तरावर कल्याणकारी योजना व धोरण निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.