अनिल कांबळे,
नागपूर,
downtown-hookah-parlor-raided : युवा पीढीला नशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पाेलिस आयुक्तांनी सकारात्मकता दाखवून ‘ऑपरेशन थंडर’ सुरु केले आहे. शहरातील हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही ठाणेदारांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टाेपली दाखवली. शहरात अजुनही हुक्का पार्लरला सुरुच असून पाेलिसांनी आता सदर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘डाऊनटाउन कॅे’वर माेठी कारवाई केली. या कॅेला 30 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. सार्वजनिक शांतता, आराेग्य आणि जनहित लक्षात घेऊन, पाेलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी हे आदेश जारी केले.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माउंट राेडवर स्थित असलेल्या ’डाऊनटाउन कॅे’मध्ये ग्राहकांना अवैधपणे हुक्का पुरवला जात असल्याबाबत बèयाच काळापासून तक्रारी प्राप्त हाेत हाेत्या. या तक्रारींची दखल घेत, पाेलिसांनी या कॅेवर अनेकदा छापे टाकले हाेते आणि कॅे चालकांना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले हाेते. या उपाययाेजना करूनही, कॅेमध्ये हुक्का सेवनाची सुविधा अद्यापही सुरूच असल्याचे अहवाल येत हाेते. पाेलिसांच्या नाेंदीनुसार, जानेवारी ते मे 2026 या कालावधीत ’डाऊनटाउन कॅे’वर चार वेळा कायदेशीर कारवाई करण्यात आली हाेती. प्रत्येक वेळी तपासणीदरम्यान, ग्राहकांना हुक्का सेवन करताना आढळून आले हाेते.
याप्रकरणी, कॅे चालकाविरुद्ध (सिगारेट्स आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा) अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला हाेता. तरीही, कायदेशीर प्रक्रिया आणि वारंवार दिलेल्या इशाèयानंतरही, नियमांचे उल्लंघन सुरूच राहिले. या सततच्या उल्लंघनांची गंभीर दखल घेत, डीसीपी नित्यानंद झा यांनी ’भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ च्या कलम 163(2) अन्वये आदेश जारी केला असून, कॅे 30 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील. सार्वजनिक आराेग्य आणि कायदा व सुव्यवस्थेशी तडजाेड करणाèया आस्थापनांना काेणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट आदेश पाेलिस आयुक्ताने दिले आहे. नियमांचे उल्लंघन करणाèयांवर कठाेर कायदेशीर कारवाई केली जाईल.