भंडारा,
dr namira दंत वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीच्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच "नीट एमडीस" भंडारा येथील डॉ. नमीरा मोहम्मद गालीफ सिद्दिकी हिने पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ऑल इंडिया रँक 1 मिळवीत भंडारा जिल्ह्याच्या देशपातळीवर उज्वल केले आहे.
भंडारा येथील भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते असलेल्या आबिद सिद्दिकी यांची ती पुतणी असून सिद्दिकी घराण्यातील पाचवी डॉक्टर आहे. आबिद सिद्धीकी यांचे दोन सुपुत्र सुद्धा डॉक्टर आहेत. डॉ. नमिरा ही त्यांच्या लहान भावाची मुलगी आहे. नागपूर येथील एका खाजगी महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. याच शाखेतील पदव्युत्तर पदवी म्हणजेच एमडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल द्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीच्या सामायिक प्रवेश पूर्व परीक्षेत म्हणजेच "नीट"मध्ये तीने राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे. 960 पैकी 802 गुण मिळवीत देशात अव्वल ठरली आहे.dr namira अत्यंत कठीण अशा परीक्षेत यश मिळवून देशात पहिल्या आलेल्या नमीरा हिने भंडारा जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या यशामुळे ती आता दंतवैद्यकीय क्षेत्रातील दंतशल्य चिकित्सा या विषयात पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेणार आहे.
यशाची खात्री होती मात्र, देशपातळीवर पहिले येणे माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने आणि प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नातून हे साध्य झाल्याचे डॉ.नमीरा हिने सांगितले.