‘आधुनिक श्रावणा’ची अशीही पितृभक्ती

खांद्यावरून नेले अनसूया मातेच्या दर्शनाला

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
darwha-news : एकीकडे आधुनिकतेच्या नावावर आई-वडील व मुलाचा संवाद कमी होत आहे. अनेक मुले आपल्याच जन्मदात्यांना कधी वाèयावर सोडून तर कधी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत आहेत. ही परिस्थिती असूनसुद्धा भारतीय समाजात संस्कार व पारिवारिक मूल्य जपणूक करताना आधुनिक ‘श्रावणबाळ’ दृष्टीपथात पडतात. हेच श्रावणबाळ भारतीय संस्कार आणि संस्कृतीचा आदर्श समाजासमोर ठेवतात.
 
 
 
y3Jun-Darshan
 
 
 
भक्तीभावाने आणि गुरूचरणी अखंड श्रद्धा अर्पण करत मुंगसाजी महाराज संत मंदिर जुन्या भजनी मंडळाच्या वतीने 1 जून रोजी श्रीसंत काशी विश्वनाथ बाबा संस्थान, मातृतीर्थ तलाव, माहूरगड येथे भजन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. ही भजनसेवा गजानन महाराज पांढरकर यांच्या आयोजनातून काशिनाथबाबांना समर्पित करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात रंगून गेला.
 
 
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बदुकले, मंदिराचे पुजारी चंद्रकांत चिरडे तसेच विजय निमकर, रमेश दुधे, राजेश चिरडे, अर्जुन दुधे, सतीश दुधे, हितेश निमकर, हितेश तèहेकर, सचिन दुधे, श्याम डांगे, आकाश निमकर, राम मते, अमोल निमकर, कार्तिक दुधे, सुदाम आसोले, जगन राठोड, आकाश महाराज, कैलास निमकर, उमेश माकोडे, गजानन दुधे, अनिल दुधे, संदीप बदुकले, रूपेश निमकर, कुमार झाडे आणि पवन चव्हाण यांनी भक्तीभावाने भजन सेवा अर्पण केली.
 
 
आधुनिक श्रावणबाळ..!
 
 
ही घटना माहूर येथे सोमवार, 1 जून रोजी प्रत्यक्ष अनुभवास आली. एका आधुनिक श्रावणबाळाने आपल्या पित्याला खांद्यावर बसवून अनसूयामातेचा गड चढून दर्शन घडविले. राजेश चिरडे व माऊलींच्या कार्यकर्त्यांनी मंदिराचे पुजारी चंद्रकांत चिरडे यांना माहूरगड येथील श्रीक्षेत्र अनसूया मातेच्या गडावर खांद्यावर नेवून पितृसेवेचा खरा लाभ घेतला.