मुंबई
Gorai Mangrove Park बोरीवलीतील गोराई परिसरात मँग्रोव्ह पार्क तात्काळ नागरिकांसाठी खुले करावे या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाल्याची माहिती मिळाली.
गोराईतील मँग्रोव्ह पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळी बॅरिकेड्स उभारून प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी हे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न करत पार्क परिसरात घुसण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली.पोलिस आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करत धरपकड सुरू करावी लागली. या कारवाईनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, ठाकरे Gorai Mangrove Park गटाच्या युवा सेनेच्या वतीने आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. मँग्रोव्ह पार्क नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी यावेळी पुन्हा जोरदारपणे मांडण्यात आली. हे उद्यान तात्काळ सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.