हिंगणघाट,
student-felicitation-ceremony : पत्रकार संघ हिंगणघाटच्या वतीने व बळीराजा बाजारच्या सौजन्याने हिंगणघाट भूषण पुरस्कार व तालुयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शुक्रवार ५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक आनंदधाम जैन कटारिया भवन येथे करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी आ. समीर कुणावार राहतील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे तर नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, तहसीलदार योगेश शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, ठाणेदार अनिल राऊत, बळीराजा बाजारचे संचालक राजू राठी, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
यावर्षीचा हिंगणघाट भूषण पुरस्कार रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणारे रुग्णमित्र गजानन उर्फ गजू कुबडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागरिक, पालक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, सचिव राजेश कोचर व उपाध्यक्ष मुकेश चौधरी यांनी केले आहे.