मानोरा,
hunger-strike : केंद्र व राज्य सरकारने दिव्यांगांच्या युडीआयडी कार्ड संदर्भात घेतलेल्या नवीन निर्णयामुळे दिव्यांगाच्या उपजीविकेवर परिणाम होत असून, यामुळे दिव्यांगामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत आधार’ फाऊंडेशन यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन दिव्यांग बांधवांनी १ जून पासून तहसील कचेरीवर उपोषणाला सुरुवात केली होती. नायब तहसीलदार अष्टुरे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आश्वासन दिल्याने लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.

’आधार’ फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार, यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, सरकारच्या नवीन निर्णयाचा थेट परिणाम दिव्यांगांच्या दैनंदिन जीवनमानावर होत आहे. जीवनमान सुकर करण्याऐवजी त्यांना हा निर्णय त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे दिव्यांगांवर अन्याय करणारे जीआर तात्काळ रद्द करा, तात्पुरते युडीआयडी तपासणी समिती द्वारे तपासून फसवणूक करणार्यांवर कारवाई करा, तपासणी समिती तातडीने गठीत करा, तहसील कार्यालयात तपासणी शिबिर लावा या मागण्या तात्काळ मान्य करण्यासाठी प्रा. जय चव्हाण यांनी दिव्यांग बांधवासह उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु महसूल विभागाच्या अधिकार्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महंत रमेश महाराज, पृथ्वीराज राठोड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.