मानोरा,
intense-heat : मृग बहार घेण्यासाठी संत्रा बांगाना पाणी न देता ताणावर सोडल्या जाते व पाऊस लवकर आला तर मृग बहार फुटतो. मात्र, मागील आठवड्याच्या अती उष्म तापामानामुळे व जादा ताण बसत असल्यामुळे तालुयातील अनेक गावा मधील बगीच्या मधील झाडे सुकण्याच्य मार्गावर आहेत.
लिंबूवर्गीय संत्रा फळपीका ला वर्षातुन दोनवेळा फळधारणा येते. त्यामध्ये मृग बहार व अंबीया बहार घेतला जातो. मात्र, तालुयात फक्त मृग बहार घेण्यावर बहुतेक शेतकर्याचा कल आहे. त्याचे कारण म्हणजे उन्हाळ्या मध्ये पाण्याची पातळी खोल जात असल्यामुळे संत्रा फळबागांना पाणी पुरवठा करणे कठीण होते. त्यामुळे बागांना ताण द्यावा लागतो. माा, वाढत्या तापमानामुळे जमीनी मधील आद्रता प्रमाण कमी होते. त्यात शेतकर्यानी बगीचे ताणावर सोडल्यामुळे संत्रा बगीचा मधील अती ताणामुळे काही झाडे सुकत चालली असून, येणार्या मुग नक्षत्रा मध्ये पाऊस आला नाही तर तालुयातील संत्रा बागा उध्वस्त होतील, असे कृषी जानकारांचे मत आहे.