अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Crime Branch action दराेड्याचा कट रचत नागपुरात दबा धरून बसलेल्या परराज्यातील तीन सराईत गुन्हेगारांना नागपूर पाेलिसांनी सापळा रचून अटक केली. या टाेळीतील तिघेही रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून ते तिघांच्या टाेळीतला सूत्रधार हरियाणा तर दाेघे बिहार राज्यातील रहिवासी आहेत.
राजू जसपाल सिंग (42, रा. कुरुक्षेत्र हरियाणा), भाेला उफर् बिरेंदर सुखदेव पासवान (40, छपरा, बिहार) आणि राजेश पारस शहा (52, रा. मडाेरा, बिहार) अशी या सराईत घराेफोड्यांची नावे आहेत. तिघांवरही यापूर्वी त्या त्या राज्यांमध्ये घराेडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या तिघांकडेही चाेरीच्या दागीन्यांमधील तब्बल 143 ग्रॅम साेने आणि 112 ग्रॅम चांदी आणि राेख 10 हजार पाेलिसांना सापडले आहे. घराेड्या करण्यात सराईत असलेली ही टाेळी नागपुरात आली असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना बातमीदारांकडून मिळाली. त्या आधारे घराेडी विराेधी पथकाने रेल्वेस्थानक, गणेशपेठ बसस्थानक परिसरातले हाॅटेल, लाॅज आणि गेस्ट हाऊसची झडती सुरू केली. साेमवारी रात्री घराेडी विराेधी पथक गणेशपेठ पाेलिस हद्दीतील रजत प्लाझा इमारतीमध्ये असलेल्या हरनूर गेस्ट हाऊसमध्ये छापा टाकून तपासणी करत असताना तिघेही पाेलिसांना तिथे सापडले. झडती घेतली असता तिघांकडेही पाेलिसांना चाेरीच्या घटनांमधील साेन्या- चांदीचे दागीने सापडले. चाैकशी केली असता तिघांनीही भुसावळ येथील वांजाेळा मार्गावरील हुडकाे काॅलनीत चाेरी केल्याचे कबूल केले. हे दागीने त्याच चाेरीच्या घटनेतील असल्याचे तिघांनीही कबूल केले. गुन्हे शाखेच्या घराेडी विराेधीपथकाने याची माहिती जळगाव पाेलिसांना देताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी जळगाव जिल्हा पाेलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक नागपुरात दाखल झाले.