संवाद, संपर्क आणि समन्वय महत्त्वाचा ठरला

भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची मुलाखत

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास,
वर्धा, 
sanjay-gate : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, विद्यार्थी परिषद पुढे पक्षाचे संघटनात्मक काम, त्यानंतर भाजपा ओबीसी मोर्चाची प्रदेशाची जबाबदारी आणि आता एक वर्षांपासुन भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना संवाद, संपर्क आणि समन्वय या तीन ‘स’ला महत्त्व दिले. पक्षाने जी जी काही जबाबदारी वर्षभर्‍यात दिली ती समाधानकारकपणे पुढे नेतो आहे, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली.
 
 
 
gaate
 
 
 
वर्धा जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून वर्षपूर्तीनिमित्त ते तरुण भारतसोबत बोलत होते. गाते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळत असते. ती संधी आपल्याला आपल्या नशिबाने मिळाली असे म्हणत असताना नशिबाला कामाची जोड असावी लागते. पक्ष कार्यकर्त्यांच्याच भरोश्यावर मोठा झाला आहे अजूनही कार्यकर्ते तन-मन-धनाने पक्षाच्या प्रत्येक कामात पुढे असते. जिल्हाध्यक्ष म्हणून जी जबाबदारी पक्षाने दिली आहे. ती आपण स्वत: सांभाळू शकत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी कायम आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत असते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शतप्रतिशत भाजपा हे अभियान आपण जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळताच पुर्ण केले. जिल्ह्यातील प्रत्येक बुथ सक्षम केलेला आहे. जिल्ह्यातील १३४२ पैकी १३४० बुथसोबत समन्वय साधला. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ या कार्यक्रमात वर्धा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे आर्वी तालुयाने तर सलग तिसर्‍यांदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याला अभिमान आहे. आर्वी पाठोपाठ हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदार संघानेही मन की बात या कार्यक्रमासाठी मोठी मजल मारली आहे. पुढच्या सत्रात देवळी विधानसभा मतदार संघही या तीनही विधानसभा मतदार संघासोबत मन की बात कार्यक्रमात पुढे राहिल असा विश्वास गाते यांनी व्यत केला.
 
 
पक्षाने जिल्ह्याने सेवा, सुशासन व गरीब कल्याण अभियान राबवण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील सर्व मंडळाचा प्रवास झाला आहे. संघटनात्मक कार्यकारिणी पुर्ण झाली आहे. चारही विधानसभा मतदार संघातील प्रशिक्षण वर्ग पुर्ण झाले आहेत. बुथ समिती गठीत झाली असुन एसआयआरच्या कार्यशाळाही पुर्ण झाल्या आहेत. आमचे एसआयआर पदाधिकारी जनगणनेत बीएलओंना मदत करीत आहेत. विधानपरिषद निवडणुकीत आमचा महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहेत यात आम्हाला शंका नाही. आम्ही पक्ष म्हणून राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वत: शेवटी असे काम करतो आहोत. वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात भाजपाचे काम चांगले आहे. भविष्यात लोकसभा मतदार संघ भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी आम्ही नियोजन करू, असेही गाते म्हणाले.