जिजाऊंच्या भूमिकेतील प्रवास अविस्मरणीय

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
मुंबई
Bhagyashree  मराठी चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक आणि चर्चेत असलेला चित्रपटराजा शिवाजी याच्या प्रदर्शनाला 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर आता एक महिना पूर्ण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
 

Bhagyashree  
या चित्रपटात जिजाऊंची भूमिका अभिनेत्री भाग्यश्रीयांनी साकारली असून, त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. चित्रपटाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी सामाजिक माध्यमांवर, विशेषतः इन्स्टाग्रामवर, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही खास छायाचित्रे शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.भारतीय इतिहासातील अत्यंत सन्माननीय आणि कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या जिजाबाईंची भूमिका साकारून एक महिना पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ही भूमिका त्यांच्या दृष्टीने अत्यंत अर्थपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आपल्या पोस्टमध्ये Bhagyashree  त्यांनी पुढे म्हटले आहे की, आदर्श नायिकेची भूमिका साकारण्यापासून ते जिजाऊंसारख्या सामर्थ्यशाली ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे रूप साकारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अतिशय महत्त्वाचा आणि अनुभवसमृद्ध राहिला आहे. या संक्रमणामध्ये जीवनातील अनुभवांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.