कांचन गडकरी यांनी घेतले संत भोजाजींचे दर्शन

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
आजनसरा, 
kanchan-gadkari : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सौभाग्यवती, ज्येष्ठ समाजसेविका कांचन गडकरी यांनी आज बुधवार ३ रोजी संत भोजाजी महाराजांचे दर्शन घेतले.
 
 
jk
 
 
 
त्यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी त्यांचा शाल-श्रीफळ व महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी सचिव शिवदास पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, विश्वस्त रमेश ठाकरे, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, महेश कोसूरकर, शालिनी इखार, पं. भूषण पांडे, पत्रकार मंगेश वनिकर, वैशाली वनिकर, संत भोजाजी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गंगाधर कोल्हे, दिवाकर खडसे, पंढरी उमाटे, रामकृष्ण कोपरकर, विश्वनाथ रेवतकर, माजी सरपंच कृष्णाजी पर्बत, जनार्धन जवंजाळ, मोहन गंडाईत आदी उपस्थित होते. कांचन गडकरी यांनी देवस्थान द्वारा संचालित असलेल्या सेवार्थ दवाखान्याला भेट दिली असता व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश जहागीरदार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
 
तीर्थस्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात महाप्रसादासाठी तयार होणारी पुरणपोळी पाहून त्या गहिवरुन गेल्या. संत भोजाजींच्या समाधीपुढे येताच मनाला विलक्षण शांती मिळाली, एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवलेला पुरणपोळीचा प्रसाद आपण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. इथली ऊर्जा पुढील सेवाकार्यासाठी बळ देते, अशा भावना त्यांनी व्यत केल्या. त्यांनी डॉ. पर्बत व विश्वस्तांचे आभार मानले.