'बोल्डसीन'मुळे कुटुंबीय नाराज

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
मुंबई
Kangana Ranaut अभिनेत्री तसेच खासदार कंगना रणौत यांनी बॉलिवूडमध्ये दमदार आणि लक्षवेधी भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक कौटुंबिक अपेक्षांच्या विरोधात जाऊन त्यांनी अभिनयक्षेत्रात प्रवेश करत मुंबई गाठली आणि करिअरच्या सुरुवातीलाच धाडसी निर्णय घेतले.
 

Kangana Ranaut  
त्यांच्या पहिल्याच चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘गँगस्टर’मधील भूमिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. या चित्रपटात त्यांनी काही बोल्ड दृश्ये साकारली होती. करिअरच्या निवडीवरून आधीच कुटुंबीयांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ‘गँगस्टर’सारखा चित्रपट स्वीकारल्यामुळे घरातील तणाव अधिक वाढल्याचे त्यांनी अलीकडील एका मुलाखतीत सांगितले.
कंगना यांनी सांगितले की, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांनी आईला विचारले असता, आईने त्या दृश्यांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे जाणवले. यामुळे त्यांना निराशा आणि राग दोन्ही वाटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटातील इतर पैलूंकडे दुर्लक्ष करून केवळ काही दृश्यांवरच प्रतिक्रिया देण्यात आल्याने त्यांना वाईट वाटले, असेही त्यांनी नमूद केले.कुटुंबीयांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांमुळे त्यांना असे वाटू लागले की ते त्यांच्या चित्रपटांकडे फारसे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत नाहीत. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन आपल्या कामावर कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहणार नाही, असा निर्णय घेतला, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.
तथापि, त्यांच्या करिअरला Kangana Ranaut  मोठी दिशा मिळाल्यानंतर आणि राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाल्यानंतर कुटुंबीयांच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या पालकांनी अभिमान व्यक्त केला आणि मुलीच्या यशाची दखल घेतली. राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या सन्मानामुळे कुटुंबीयांसाठी तो एक निर्णायक क्षण ठरल्याचे त्यांनी नमूद केले.