सुश्मिता सेन 'गोल्ड डिगर' नाही

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
मुंबई
Lalit Modi आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्या नात्याबाबत काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या नात्याची कबुली दिल्यानंतर अनेकांनी सुश्मिता सेनवर ‘गोल्ड डिगर’ असल्याचे आरोप केले होते. या वादावर आता प्रथमच ललित मोदी यांनी सविस्तर भाष्य करत सुश्मिता सेनची बाजू मांडली आहे.
 

Lalit Modi on Sushmita Sen, Sushmita Sen Gold Digger Controversy, 
एका मुलाखतीत बोलताना ललित मोदी यांनी ट्रोलर्सवर टीका करताना सांगितले की, सुश्मिता सेनबाबत करण्यात आलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक होते. “लोकांनी सुश्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हटले तेव्हा मला अत्यंत वाईट वाटले. आम्ही एकत्र असताना तिने माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही. उलट मीच तिच्यासोबत एका ‘केप्ट बॉयफ्रेंड’प्रमाणे राहत होतो,” असे त्यांनी म्हटले.मोदी यांनी पुढे सांगितले की, दोघे एकत्र प्रवास करत असताना किंवा बाहेर जात असताना अनेकदा हॉटेलची बिले आणि इतर खर्च सुश्मिता सेन स्वतः करत असे. “तिने मला कधीही तिचा खर्च करू दिला नाही. ती अत्यंत स्वाभिमानी, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर उभी असलेली महिला आहे. त्यामुळे तिच्यावर पैशांसाठी नात्यात राहिल्याचा आरोप करणे योग्य नाही,” Lalit Modi असे त्यांनी स्पष्ट केले.मोदी यांनी सुश्मिता सेनसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यामागील किस्साही सांगितला. त्यांच्या मते, ती पोस्ट पूर्णपणे अनपेक्षितपणे करण्यात आली होती. “मी पोस्ट करण्यापूर्वी सुश्मिता माझ्यासोबतच होती. मी खरोखरच ती पोस्ट करेन, यावर तिचा विश्वास नव्हता. आम्ही विमानात एका विषयावर चर्चा करत होतो. त्यावेळी तिने मला ‘तू हे पोस्ट करणार नाहीस’ असे म्हटले. त्यानंतर मी हसत ती पोस्ट केली,” असे मोदी यांनी सांगितले.
 
 
पोस्ट व्हायरलLalit Modi  झाल्यानंतर निर्माण झालेल्या प्रतिक्रियांबाबत बोलताना ते म्हणाले की, विमानातून उतरेपर्यंत या पोस्टची मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यात काहीही चुकीचे नव्हते आणि त्या निर्णयाबद्दल आम्हाला कोणताही पश्चात्ताप नाही, असेही त्यांनी नमूद केले.ललित मोदी यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या आणि सुश्मिता सेन यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना उधाण आले असून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.