सदर भागातून बेपत्ता अल्पवयीन मुलगी भंडारा जिल्ह्यात गवसली

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर
Bhandaara Girl Rescue सदर पोलिस ठाणे हद्दीतून बेपत्ता झालेली सोळा वर्षांची अल्पवयीन मुलीचा भंडारा जिल्ह्यात शोध लागला. तिला गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने भंडा-यातून ताब्यात घेत शहरात आणले.
 

Missing Minor Girl Nagpur Found, Bhandaara Girl Rescue Case, 
माहितीनुसार, सदर परिसरात राहणा-या ३९ वर्षीय तक्रारदारांची १६ वर्षांची मुलगी जानेवारी महिन्यात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. घरच्यांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर, तिला अज्ञात आरोपीने आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास Bhandaara Girl Rescue गुन्हेशाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक करत होते. यादरम्यान गत सोमवारी पथकाला मिळालेल्या माहितीवरून ही अल्पवयीन मुलगी भंडारा जिल्ह्यातील बाळापूर (पो. ठाणे गोबरवाही) येथे असल्याचे समजले. त्या आधारे पोलिसांचे पथक गोबरवाही येथे रवाना झाले. तिथे शोध घेतला असता, ती मुलगी सम्मी दुख्खू धुर्वे (६२, बाळापूर, जि. भंडारा) यांच्या घरी मिळून आली. पथकाने मुलीला आपल्या ताब्यात घेतले असून, तिची सविस्तर विचारपूस करण्यात आली. तिचे समुपदेशन करण्यात आले आहे.