गल्लीतला स्वाद...ग्लोबलचा स्टारडम

मुंबईचा वडापावची आंतरराष्ट्रीय स्थरावर धूम

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
मुंबई
ashok vada pav गरमागरम पाव, त्यात खुसखुशीत आणि मसालेदार बटाटा वडा, सोबत झणझणीत चटणी आणि वरून कुरकुरीत चुरा… हा साधा पण मन जिंकणारा वडापाव आता केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याने थेट जागतिक खाद्यसंस्कृतीत आपली ठसा उमटवला आहे. मुंबईतील दादर परिसरातील प्रसिद्ध अशोक वडा पाव याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवत जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत स्थान मिळवले आहे.
 

mumbai vada pav, ashok vada pav dadar, 
जगभरातील पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांचे मूल्यांकन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठ टेस्ट ॲटलस यांनी नुकतीच जगातील सर्वोत्तम सँडविचची यादी जाहीर केली. या यादीत लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांतील नामांकित पदार्थांना मागे टाकत अशोक वडापावने २५ वे स्थान पटकावले असून त्याला ४.१ स्टार रेटिंग देण्यात आले आहे.दादर येथील किर्ती कॉलेजजवळ असलेला हा वडापाव स्टॉल गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांच्या जिभेवर राज्य करत आहे. साधारण १९६० च्या दशकात सुरू झालेला हा स्टॉल आजही आपल्या मूळ चवीशी प्रामाणिक राहिल्यामुळेच तो इतका लोकप्रिय ठरला आहे. चटणीची तिखटपणा, वड्याची कुरकुरीतपणा आणि पावाची मऊसर चव यांचा अप्रतिम संगम हेच या वडापावचे वैशिष्ट्य मानले जाते.
 
 
मजुरांपासून ते कॉलेज ashok vada pav  विद्यार्थ्यांपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण या ठिकाणी रांगा लावून वडापावचा आस्वाद घेताना दिसतात. हा पदार्थ केवळ भूक भागवणारा नसून तो मुंबईच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे.एकेकाळी फक्त मुंबई आणि परिसरापुरता मर्यादित असलेला वडापाव आज दिल्ली, बंगळुरू, कोलकाता यांसारख्या महानगरांमध्येही लोकप्रिय झाला आहे. मात्र, जागतिक पातळीवर मिळालेल्या या मानांकनामुळे आता या साध्या पण भावपूर्ण पदार्थाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.सोशल मीडियावरही या यशाची जोरदार चर्चा सुरू असून मुंबईकरांनी आपल्या लाडक्या वडापावच्या जागतिक यशाचा अभिमान व्यक्त केला आहे.