बंडखोरीमुळे मोठा पेच निर्माण

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
नाशिक
nashik legislative council election राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यातही काही उमेदवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता वाढल्याचे चित्र दिसत आहे.
 

nashik legislative council election, maharashtra political rebellion 
नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र महायुतीच्या झालेल्या समन्वय बैठकीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला. या निर्णयानंतर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.दरम्यान, या घडामोडींमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर गणेश गीते यांचे बंधू गोकूळ गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत नवा ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे गीते बंधूंच्या भूमिकेमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
 
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही nashik legislative council election  काही प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र असून विष्णुपंत म्हैसधुने आणि गोरख बोडके यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणूक अधिक चुरशीची आणि बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी गीते बंधूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप गीते बंधू कोणत्याही प्रमुख महायुती नेत्यांच्या संपर्कात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महायुतीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
दरम्यान, गोरख बोडके nashik legislative council election  यांनी मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांची भेट घेऊन निवडणुकीतून माघार घेण्याबाबत चर्चा केल्याचेही समोर आले आहे. या चर्चेनंतर बंडखोर उमेदवार लवकरच माघार घेतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांचा मतदानाचा कल कोणाकडे जाईल, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नाशिकमधील या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीचे समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले असून पुढील काही दिवसांत यावर स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.