मुंबई
Rahul Roy 1990 च्या दशकात ‘आशिकी’ या सुपरहिट चित्रपटातून रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच सोशल मीडियावरील रील्समधील त्याच्या उपस्थितीमुळे चर्चेत आलेल्या राहुलचा आता ‘लाफ्टर शेफ 3’ या कुकिंग रिअॅलिटी शोमधील आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला असून त्यातील त्याचे वागणे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या प्रोमोमध्ये राहुल रॉय त्याच्या शैलीत ‘आशिकी’मधील लोकप्रिय गाणे गात शोमध्ये एण्ट्री करताना दिसतो. प्रेक्षकांसह इतर कलाकारांकडून त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले जाते. मात्र काही क्षणांतच वातावरण बदलते आणि सेटवरील आनंदी मूड तणावपूर्ण बनतो.
शोच्या सूत्रसंचालक भारती Rahul Roy सिंह राहुलला सांगते की, या एपिसोडमध्ये त्याची जोडी अभिनेत्री निया शर्मा सोबत असेल आणि दोघांना मिळून एक पदार्थ तयार करायचा आहे. ही माहिती मिळताच राहुल नाराजी व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया देतो. त्याला स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या निया शर्मासोबत काम करणे पटत नसल्याचे तो स्पष्टपणे दाखवतो. रागाच्या भरात तो गिटार जमिनीवर आदळतो आणि “मी हा शो करणार नाही,” असे म्हणताना दिसतो. या घटनेमुळे सेटवरील सर्वजण अचंबित होतात.दरम्यान, निया शर्मा परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत राहुलला समजावते. ती म्हणते की, त्याच्याबद्दल त्याला चुकीची माहिती देण्यात आली असून तो जसा विचार करत आहे तशी तिची प्रतिमा नाही. तरीही राहुलचा राग कमी होत नाही आणि प्रोमोमध्ये तणाव कायम राहतो. या दृश्यांमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून काही जणांनी त्याच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी हा केवळ प्रमोशनल स्टंट असू शकतो, अशी शक्यताही वर्तवली आहे. हा एपिसोड आल्यानंतर नक्की काय झाले हे पाहण्याजोगे राहील