'डॉन ३' प्रकरणात रणवीरची कायदेशीर लढाई सुरू

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Ranveer's Legal Battle Begins 'डॉन ३' या बहुचर्चित चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र झाला असून, अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपट क्षेत्रातील संघटना यांच्यातील संघर्षाने नवे वळण घेतले आहे. चित्रपटातून माघार घेतल्यानंतर रणवीर सिंगविरोधात काही कठोर भूमिका घेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर अभिनेत्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संघटनेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या घडामोडीची पुष्टी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली असून, नोटीसमध्ये नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
 
 

ranveer singh
 
'डॉन ३'च्या निर्मितीदरम्यान रणवीर सिंगने प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर वादाची ठिणगी पडली होती. या निर्णयामुळे निर्मात्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित पक्षांमध्ये मतभेद वाढले आणि प्रकरण उद्योग संघटनांपर्यंत पोहोचले. याच पार्श्वभूमीवर रणवीरविरोधात असहकाराची भूमिका घेण्यात आल्याची चर्चा रंगली.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी चित्रपट संघटनेकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या परिषदेत वादाची सद्यस्थिती, संघटनेची भूमिका आणि पुढील घडामोडींबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
 
 
'डॉन ३' या चित्रपटाला गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. कलाकारांच्या बदलत्या उपलब्धता, वेळापत्रकातील अडचणी आणि इतर कारणांमुळे प्रकल्पाच्या कामात अनेकदा विलंब झाला. काही कलाकारांनी वैयक्तिक कारणांमुळे चित्रपटापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा होती.आता रणवीर सिंगने कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर हा वाद आणखी कोणते वळण घेतो आणि संबंधित पक्षांमध्ये तोडगा निघतो का, याकडे बॉलिवूडसह चाहत्यांचेही लक्ष लागले आहे.