कारंजा लाड,
rise-in-soybean-prices : आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती मागणी, अमेरिकेतील संभाव्य उत्पादन घट आणि देशांतर्गत कमी झालेला साठा यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली आहे. कारंजा बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ६,८०० ते ७,७०० रुपयांपर्यंत भाव मिळत असून गेल्या तीन वर्षांतील ही सर्वाधिक दरवाढ मानली जात आहे. मात्र, बहुतांश शेतकर्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच कमी दरात माल विकून टाकल्याने या तेजीचा प्रत्यक्ष फायदा व्यापारी आणि साठेबाजांनाच होत असल्याचे चित्र आहे.

प्राप्त माहितीनुसार एप्रिलच्या तिसर्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. मे महिन्याच्या सुरुवातीला सुमारे ६,१५० रुपये असलेला दर आता ८ हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल असताना सध्याचा बाजारभाव त्यापेक्षा तब्बल १,५०० ते २ हजार रुपयांनी अधिक आहे. खाद्यतेल उद्योगांकडून वाढलेली मागणी, जागतिक बाजारातील चढ - उतार आणि मर्यादित आवक यामुळे गेल्या महिनाभरात सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल १ हजार ते १,२०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दर ८ हजारांपर्यंत जाण्याची शयताव्यापारी आणि बाजार तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांतही सोयाबीनच्या दरातील तेजी कायम राहू शकते. बाजारात आवक कमी असून मागणी वाढत असल्याने सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शयता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात विक्रीसाठी माल शिल्लक नसल्याची खंतही अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
उत्पादन खर्चातील वाढ, कर्जफेडीचा ताण आणि आर्थिक गरजांमुळे बहुतांश शेतकर्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच कमी दरात सोयाबीन विकले. अंदाजे ७५ टक्के शेतकर्यांकडे सध्या विक्रीसाठी माल शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्याच्या वाढलेल्या दरांचा लाभ व्यापारी आणि साठेबाजांनाच अधिक प्रमाणात मिळत आहे.
शेतकर्यांच्या मनात दरवाढीचा आनंद आणि हुरहूर
शेतकर्यांनी सरकारकडे बाजारातील दरवाढीवर लक्ष ठेवण्याची आणि साठेबाजीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात शेतकर्यांना योग्य दर मिळावा यासाठी साठवणूक सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि बाजार व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली आहे. सोयाबीनचे भाव वाढले, पण माल शिल्लक नाही, त्यामुळे दरवाढीचा आनंद आणि हुरहूर दोन्ही शेतकर्यांच्या मनात आहे.