परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला मारहाण

*आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर, 
student-assaulted : महाविद्यालयात परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला जाम येथे रस्त्यावर अडवून मारहाण करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून हर्ष घिये विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार २ रोजी घडली.
 

mlkm 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, २ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर येथे द्वितीय वर्षाच्या परीक्षेला जात होती. दरम्यान, जाम येथे हर्ष घिये याने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करीत मुलीला मारहाण केली. मुलीने तत्काळ पोलिस ठाणे गाठून हर्ष घिये याच्याविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बिट जमादार गंगाधर भोकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.