तभा वृत्तसेवा
वणी,
sudhir-mungantiwar : खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान होऊनही भरपाईपासून वंचित राहिलेल्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकèयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित सर्व प्रकरणांची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयात कृषीमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी अनेक शेतकèयांना प्रत्यक्ष पीक नुकसान होऊनही केवळ तांत्रिक कारणांमुळे नुकसान भरपाई नाकारण्यात आल्याचा मुद्दा ठामपणे मांडला. यामुळे शेतकèयांमध्ये तीव्र नाराजी असून या प्रकरणांचा वस्तुनिष्ठ व न्याय्य आढावा घेण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केवळ तांत्रिक अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतपातळीवरील नुकसान, पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष, हवामान विभागाच्या नोंदी तसेच शेतकèयांकडून प्राप्त निवेदने यांचाही विचार करून निर्णय घेण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत कृषिमंत्री भरणे यांनी विशेष फेरतपासणीचे आदेश दिले.
बैठकीत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई नाकारलेल्या सर्व प्रकरणांची सखोल फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राज्य कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात येणार असून ही समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे. फेरतपासणीदरम्यान प्रत्यक्ष नुकसान, पीक कापणी प्रयोग, हवामान नोंदी आणि शेतकèयांची निवेदने यांचा विचार करण्यात येणार आहे.
तसेच फेरतपासणीत पात्र ठरणाèया शेतकèयांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित विमा कंपनीने या प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे तसेच कोणत्याही शेतकèयावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व प्रकरणांचा पारदर्शक व न्याय्य पद्धतीने निपटारा करावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला कृषी सचिव रस्तोगी, कृषी उपायुक्त बोरकर, चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, विजय पिदुरकर, रवी निगुडे, बंडू गौरकार, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.