सूर्यवंशीच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ची वैभवशाली झेप!

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Suryavanshi's brand value soars वैभव सूर्यवंशीने आपल्या दमदार कामगिरीने क्रिकेटविश्वासह जाहिरात क्षेत्रातही मोठी छाप पाडली आहे. अतिशय कमी वयात राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये स्थान मिळवलेल्या या युवा फलंदाजाने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, आता त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची चर्चा आहे.आयपीएल २०२६ मध्ये केलेल्या विस्फोटक कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीवर मोठ्या ब्रँड्सचा वर्षाव सुरू झाला आहे. त्याच्या कामगिरीमुळे तो केवळ क्रिकेटपटू राहिला नसून, एक मोठा व्यावसायिक ब्रँड म्हणून उदयास आला आहे. जाहिरात क्षेत्रातील अनेक कंपन्या त्याच्यासोबत करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे समोर आले आहे.
 
 
kashmir
 
माहितीनुसार, वैभव सूर्यवंशी आधी एका ब्रँड डीलसाठी सुमारे एक कोटी रुपये आकारत होता, मात्र आता त्याची फी जवळपास दुप्पट झाली असून तो साधारण दोन कोटी रुपयांपर्यंत मानधन घेत असल्याचे सांगितले जाते. रेड बुल आणि कॉम्प्लानसारख्या मोठ्या ब्रँड्ससोबत त्याचे करार आधीच झाले असून, आता आणखी मोठ्या कंपन्या त्याच्यासाठी स्पर्धेत उतरल्या आहेत.आयपीएल २०२६ मध्ये वैभवने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप मिळवली. तसेच तो हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू (MVP) ठरला. त्याला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन आणि सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन यांसारखे अनेक पुरस्कारही मिळाले.१६ डावांमध्ये त्याने ७७६ धावा करत ७२ षटकार मारले, जो आयपीएलच्या इतिहासातील एक विक्रम ठरला आहे. या हंगामात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली असून, दोन वेळा तो शतकाच्या अगदी जवळ जाऊन अनुक्रमे ९७ आणि ९६ धावांवर बाद झाला. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो जागतिक क्रिकेटमध्ये एक उदयोन्मुख सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.