तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
election-polling-station : महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांमध्ये यवतमाळ, आर्णी व बाभुळगाव येथील मतदारांना यवतमाळ तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदान करावे लागणार आहे. वणी व मारेगाव येथील मतदारांना वणी तहसील कार्यालय, पांढरकवडा, झरी-जामणी व घाटंजी येथील मतदारांना केळापूर तहसील कार्यालय, राळेगाव व कळंब येथील मतदारांना राळेगाव तहसील कार्यालय, दारव्हा व नेर येथील मतदारांना दारव्हा तहसील कार्यालय, पुसद व दिग्रस येथील मतदारांना पुसद तहसील कार्यालय आणि उमरखेड, महागाव व ढाणकीच्या मतदारांना उमरखेड तहसील कार्यालयातील केंद्रांत मतदान करावे लागणार आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक प्रशासनाने अधिकाèयांना दिल्या असून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. येत्या शुक्रवार, 12 जून रोजी निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाèयांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.