भाजयुमोची वर्धा जिल्हा आणीबाणी वत्कृत्व स्पर्धा

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा व लोकतंत्र सेनानी गौरव

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
bjym-wardha : भाजयुमो वर्धा जिल्हाच्या वतीने स्थानिक ओएसजी टेबल टेनिस अकॅडमी येथे ‘आणीबाणी — लोकशाहीचा काळा दिवस’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि लोकतंत्र सेनानी गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
j
 
 
 
उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपा मुख्यालय प्रभारी श्रीधर देशमुख, भाजपा जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, भाजपा वर्धा शहराध्यक्ष निलेश किटे, महिला मोर्चा शहराध्यक्ष निता सूर्यवंशी उपस्थित होते.
 
 
आणीबाणी लोकशाहीचा काळा दिवस या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत १५ ते ३० वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रावणी इटनकर, द्वितीय नंदिनी देशमुख तर तृतीय क्रमांक भूमिका चौबे यांनी पटकावला. प्रोत्साहन पुरस्कार शंतनू वाटकर याला देण्यात आला.
 
 
विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे आणि पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून श्याम देशपांडे सर, सिनेट सदस्य रोशनी खेलकर आणि निलेश मुंजे यांनी जबाबदारी सांभाळली.
 
 
याचप्रसंगी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व विविध स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी सत्कार करण्यात आला. तसेच, लोकतंत्र सेनानींचा विशेष लोकशाही रक्षक गौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संचालन भाजयुमो जिल्हा सचिव शिवा डुकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजयुमो जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांनी केले.
 
 
यशस्वीतेसाठी मयंक खंडागळे, कुणाल कडवे, ऋतिक राजूरकर, ओम तिवारी, वैभव राऊत, अमोल त्रिपाठी, साहिल ठाकरे, अर्पित तिवारी,रोशन चौधरी, विपीन पेटकर, आदित्य काळमेघ, योगेश आदमने, अनिरुद्ध दंधाळे, लीलाधर डीग्रसे, दिनेश कमीणकर, अनिल चव्हाण, अंकित टेकाडे, राहुल पाटणकर, रुपेश वैध्य, आदित्य काळमेघ, अक्षय नामदार, शुभम तरेकर, संकेत बारई, सूरज माहुरे, उज्वल देशमुख, प्रसाद फिसके, अमित राऊत, युवराज माउस्कर, श्रेया लोखंडे, क्षमा मुदावने यांनी विशेष परिश्रम घेतले.