दोन किलो गांजा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर, 
cannabis-seized-case : स्थानिक गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून जाम चौरस्त्यावर सापळा रचून नंदकिशोर म्याने (४७) रा. राम मंदिर वार्ड हिंगणघाट याला गांजाची विक्री करताना रंगेहात अटक केली.
 
 
 
j
 
 
 
त्याच्याजवळून २ किलो २२७ ग्रॅम गांजासह ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २९ रोजी करण्यात आली. नंदकिशोर म्याने हा गांजाची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने जाम येथे सापळा रचला. यादरम्यान नंदकिशोर हा पायदळ येताना दिसताच पथकाने त्याला गाठून झडती घेतली. त्याच्याजवळ २ किलो २२७ ग्रॅम गांजा आढळून आला. सदर गांजाचा माल त्याने इस्ताक अहमद अब्दुल मुनाफ रा. नोहिदनगर नागपूर व सरफराज मोहम्मद रा. पारडी दर्गाजवळ नागपूर यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी नंदकिशोर म्याने, इस्ताक अहमद अब्दुल मुनाफ आणि सरफराज मोहम्मद या तिघांविरुद्ध समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गांजाचा पुरवठा करणारा इस्ताक अहमद अब्दुल मुनाफ शेख याला पारडी पोलिस स्टेशन नागपूरच्या हद्दीतून अटक करण्यात आली.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक सिनूकुमार बानोत, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अभिषेक नाईक यांनी केली.