वाशीम,
chain hunger strike महावितरण प्रशासनाने महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनशी संलग्न असलेल्या अनेक कर्मचार्यांच्या बदल्या प्रचलित नियम, धोरणे व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना डावलून केल्या असून, त्यामुळे बदल्यांमुळे संबंधित कर्मचार्यांवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात कर्मचार्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
याबाबत संघटनेने अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशीम यांना पत्र व्यवहार करून संबंधित नियमबाह्य बदल्या तात्काळ रद्द कराव्यात, सर्व प्रकरणांचा निष्पक्ष फेरविचार करावा हे कडून सुद्धा प्रशासनाने संघटनेच्या पत्राची दखल न घेतल्यामुळे संघटनेच्या सभासदांना न्याय मिळण्याकरिता ३० जून पासून मंडळ कार्यालय वाशीम समोर महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनतर्फे साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
महावितरण प्रशासनाने कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्यांचा तातडीने विचार करून नियमबाह्य बदल्या रद्द कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. सर्व कर्मचारी, पदाधिकारी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनतर्फे करण्यात येत आहे.