ज्येष्ठ संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचे निधन

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |

Kulkarni
 
मुंबई,
Chandrashekhar Kulkarni passes away मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले आणि आपल्या प्रभावी लेखनशैलीमुळे ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक चंद्रशेखर उर्फ चंदू कुलकर्णी यांचे मंगळवारी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी माध्यमविश्वात शोककळा पसरली आहे. चंद्रशेखर कुलकर्णी हे होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे संस्थापक शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक प्रा. वि. गो. कुलकर्णी यांचे सुपुत्र होते. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेत बहुआयामी योगदान देणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर 1 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.