कारंजा तालुयात २६० शाळांची वाजली पहिली घंटा

विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वितरण

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
कारंजा लाड,
distribution of uniforms and textbooks तालुयात सोमवार, ३० जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजताच नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. तालुयातील जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अशा एकूण २६० शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्‍या चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले.
 
 
distribution of uniforms and textbooks
 
विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरावा आणि शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध स्वागतपर उपक्रम राबविण्यात आले. तालुयात जिल्हा परिषदेच्या १४४, नगर परिषदेच्या १४ तसेच इतर व्यवस्थापनाच्या शाळांसह एकूण २६० शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. अनेक शाळांमध्ये फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी रांगोळ्या, फुगे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिठाई वाटप करून विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदमय करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांच्या हाती दिल्याने पालकांनाही आर्थिक दिलासा मिळाला आहे.
 
 
शाळांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायी वातावरण निर्माण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने यापूर्वीच मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व शाळांनी प्रवेशोत्सवाचे नियोजन करून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तर पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीनिशी शिक्षणाचा प्रवास सुरू झाला आहे.
 
 
पहिल्याच दिवशी साहित्याचे वितरण
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, यंदा तालुयातील ९ हजार ४०६ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरित करण्यात येणार असून, १७ हजार १६२ विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार काही ठिकाणी हे साहित्य वितरित सुद्धा करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी व गावकर्‍यांची उपस्थिती होती.