अनिल कांबळे,
नागपूर, misconduct-with-minor-girl : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शांतिनगर पोलिसांनी ४४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना आज सोमवारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिक्षण घेत असून रविवारी रात्री ती घरकाम करत होती. त्यावेळी तिची आई घराबाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी पित्याने मुलीला पाणी आणण्यास सांगितले. मुलीने पाणी दिल्यानंतर तिचा विनयभंग केला. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. वडिलांच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने रात्रभर हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आईला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आईने मुलीसह शांतिनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन अटक केली.