गर्भपातानंतर प्रियकराचा लग्नाचा नकार

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Fraud against women लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षे प्रेमसंबंध ठेवत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानंतर तिला गर्भवती करून इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. त्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
crime
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीच्या बहिणीचा दीर असून, दोघांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १ जून २०२५ ते ५ जून २०२६ या कालावधीत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तरुणीला शहरातील विविध हॉटेल व लॉजमध्ये नेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जयताळा येथील एका खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गर्भपातानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता त्याने स्पष्ट नकार दिला. या घटनेमुळे तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मध्ये उपचार सुरू आहेत. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, फसवणूक, इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणणे आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.