मराठी अभिनेत्री, २ लाखांचा सौदा आणि...

मुंबईत हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा थरार!

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
मुंबई,
high-profile-sex-racket : मुंबईतील गिरगाव परिसरात कथित उच्चभ्रू देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती समोर आली असून, या कारवाईमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकत दोन अभिनेत्रींची सुटका केली असून, या प्रकरणात एका महिला मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी महिला दलाल म्हणून काम करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
MUMBAI
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावातील एका हॉटेलमध्ये अवैध व्यवहार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रमुख अभिनेत्रीचा आणि बंगाली तसेच हिंदी चित्रपटांमध्ये लहान भूमिका साकारणाऱ्या दुसऱ्या अभिनेत्रीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी संबंधितांची ओळख गोपनीय ठेवली आहे.
 
 
या प्रकरणात आर्थिक व्यवहार, संपर्क जाळे आणि इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग यांचा तपास सुरू आहे. पोलिस हॉटेल व्यवस्थापनाची भूमिकाही तपासत आहेत. या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा शोध सध्या घेतला जात आहे.
 
 
 
 
 
या कारवाईनंतर मनोरंजन क्षेत्राशी संबंधित काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, मुंबई पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.