नागपूर
hindu samrajya din कर्वेनगर नागरिक मंडळ आणि कर्वेनगर प्रभात शाखेतर्फे रविवारी (२८ जून) हिंदू साम्राज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी व दैदीप्यमान चरित्रावर अमोल पुसदकर यांनी ओघवत्या शैलीत व्याख्यान दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक लीलाधर राजनकर होते. आजच्या तरुण पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिजाऊ, समर्थ रामदास स्वामी आणि मावळ्यांच्या पराक्रम व बलिदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आनंद तेलंग यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर विवेक फडणवीस यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाला कर्वेनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजाभिमुख संघटनांच्या माध्यमातून समाज आणि संघ एकत्र येऊन राष्ट्र अधिक समर्थ व बलशाली व्हावे, हा कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सौजन्य: शेफाली तळवलकर, संपर्क मित्र