...आणि प्रवाशांचा सुखाचा प्रवास रक्ताने माखला!

यमुना एक्सप्रेसवेवर बसचा भीषण अपघात; ४ ठार, २५ गंभीर!

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
लखनौ,
bus-accident : उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. दिल्लीहून उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान खाजगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्यावरील एका ट्रेलरला (मोठ्या ट्रकला) मागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या दुर्दैवी घटनेत ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
  
 

ACCIDENT 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एक्सप्रेसवेवर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात होताच बसमध्ये एकच चीत्कार आणि आक्रांदनाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. बसचा पत्रा कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.