१ विवाहिता, १४ आरोपी; महिन्याभरानंतर 'त्या' व्हिडिओने उडवली झोप!

जळगावात प्रेमीसोबत गेलेल्या महिलेवर जंगलात अत्याचार

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
जामनेर,
woman-raped-in-forest : जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमीसोबत जामनेर येथे आलेल्या एका विवाहित महिलेवर जंगलात नेऊन दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना घडून जवळपास महिना उलटला होता, मात्र आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्यामुळे अखेर हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तब्बल १४ जणांना अटक केली आहे.
 
 
RAPED
 
 
नेमकी घटना काय?
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित विवाहित महिला तिच्या प्रेमीसोबत जामनेर परिसरात आली होती. तिथून जात असताना काही नराधमांनी त्यांना गाठले. त्यांना धमकावून जंगलाच्या भागात नेण्यात आले. तिथे दोघांनी पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रकार उघड
या घटनेनंतर पीडित महिला आणि तिचा साथीदार प्रचंड घाबरले होते. भीतीपोटी त्यांनी सुरुवातीला पोलिसांत धाव घेतली नाही किंवा कोणालाही याबद्दल सांगितले नाही. मात्र, घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी या कृत्याचा आणि पीडितेला धमकावल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. महिनाभरानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
हा व्हिडिओ स्थानिक पोलीस आणि सायबर सेलच्या निदर्शनास येताच संपूर्ण पोलीस यंत्रणा जागी झाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चक्र फिरवली.
पोलिसांची मोठी कारवाई; १४ जण गजाआड
व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. या गुन्ह्यात थेट बलात्कार करणारे, त्यांना मदत करणारे आणि व्हिडिओ बनवून तो व्हायरल करणाऱ्या अशा सर्व घटकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण १४ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दोषींना कडक शिक्षा मिळवून देण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत.