मानोरा तालुयात जिओ मोबाईल सेवा विस्कळीत

ग्र्राहकात तीव्र संताप

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
मानोरा,
jio mobile service disrupted तालुयातील रूई - गोस्ता सह परिसरात गेल्या ६ दिवसांपासून एका आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपनी जिओची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे परिसरातील डिजिटल व्यवहार, बँकिंग सेवा आणि संपूर्ण संपर्क यंत्रणा कोलमडून पडली आहे.
 
 
jio mobile service disrupted
 
दरमहा महागडे रिचार्ज करूनही सेवा मिळत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकर्‍यांमध्ये संबंधित कंपनीच्या दिशाहीन कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आजच्या डिजिटल युगात बँक खात्यातून पैशांची देवाणघेवाण, गुगल पे, फोन पे यांसारख्या सेवांवर नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, मोबाईलला रेंज नसल्याने गावातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाच ते सहा दिवस उलटून गेले तरी संबंधित कंपनीच्या तांत्रिक विभागाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. दरम्यान, मोबाईलच्या टॉवरमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, याची कोणतीही माहिती स्थानिक पातळीवर दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ आणि संताप अधिक वाढला आहे.
 
 
मोबाईल कंपनी दरमहा रिचार्जचे पैसे पूर्ण घेतात, मग ग्राहकांच्या वाया गेलेल्या दिवसांची नुकसान भरपाई कोण देणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. मोबाईलचे नेटवर्क पूर्णवत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मानोरा तालुयाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या रुई परिसरात जिओचे टॉवर आहे. या भागात मोबाईलला रेंज दाखवते कॉल लागत नाही, कदाचित कॉल लागला तर आवाज येत नाही. त्यामुळे टॉवर असूनही फायदा नाही. फोन लागत नसल्याने अनेक अडचणीचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत आहे. संबंधितांनी तात्काळ समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.