काव्या मारनचं लग्न ठरलं?

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
मुंबई, 
Kavya Maran's marriage सनरायझर्स हैदराबादची सीईओ आणि चर्चेत असलेली मालकीण काव्या मारन पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काव्या मारनच्या लग्नाबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता अधिक वेग आला असून, ती लवकरच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंद्रन यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या नात्याबाबत याआधीही अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावेळी या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. आता अनिरुद्ध यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवे बळ मिळाले आहे.
 
 

kavya maran wedding 
अनिरुद्ध यांचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी एका मुलाखतीत या विषयावर भाष्य केले. मुलाखतीदरम्यान अनिरुद्धच्या लग्नाविषयी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, "अनिरुद्ध हा अत्यंत समजूतदार मुलगा आहे. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, काव्या मारन यांच्याशी त्याचं लग्न जवळपास निश्चित झालंय. तो एका अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग होणार आहे. या निमित्तानं मी त्याचं अभिनंदन करू इच्छितो..." काव्या मारनबद्दल बोलताना महेंद्रन यांनी तिच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले की, "काव्या काही सामान्य महिला नाही, तिच्याकडे आयपीएलमधील एका मोठ्या संघाचं व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे. तिला तिच्या वडिलांकडून व्यवसायाची समज वारशानं मिळाली आहे. त्यांची जोडी उत्तम आहे आणि त्यांनी एकत्र येऊन संगीत व्यवसायातही नशीब आजमावून पाहायला हवं..."