ब्रह्मांडनायकाची महाउपासना व नामजपोत्सव भक्तिभावात

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
Lakshminarayan Auditorium लक्ष्मीनारायण सभागृहात २७ व २८ जून रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या ब्रह्मांडनायक महाउपासना व अखंड नामजपोत्सवाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी श्री स्वामींच्या पालखीचे शिवअनंत ढोलताशा पथकाने दणदणीत स्वागत केले. स्वामीपाठाचे पठण, आकर्षक रांगोळ्या आणि भजन मंडळाच्या सुमधुर भजनांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
 
 
maharaj
 
 
अरोमा फ्लावर्स, नागपूर यांनी केलेली फुलांची सजावट आणि चिकूच्या रोपट्यांचे वितरण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.Lakshminarayan Auditorium किशोर महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीने आणि स्वामींच्या जयघोषातून भक्तांना आध्यात्मिक अनुभूती दिली.हजाराहून अधिक स्वामीभक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. महाप्रसादावेळी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या उपक्रमातून अन्नाचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सांगता गोपाळकाल्याने झाली.
सौजन्य :चंद्रशेखर क्षीरसागर,संपर्क मित्र