मातृसेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अमिन ओलिया

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
पुलगाव, 
amin-oliya : मातृसेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आज ३० जून रोजी झालेल्या सभेत संस्थेचे ज्येष्ठ संचालक अमिन ओलिया यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मातृसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शालिनी भोपे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सहकार अधिकारी गजानन शेळके यांच्या उपस्थितीत विशेष सभा संस्थेच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी सर्वानुमते अमिन ओलिया यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमिन ओलिया हे येथील जामा मस्जिदचे अध्यक्ष आहेत. भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री आहेत. अमिन ओलिया यांनी त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अविनाश भोपे व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. ओलिया यांचे भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय गाते, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे, सहकार भारतीचे प्रदीप पांडे, आदींनी अभिनंदन केले आहे.
 
 
 

j