काम संपताच साइटवरील साहित्य गायब?

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Radisson Blu Road, नरेंद्रनगर पुलाखाली, नरेंद्र हाइट्स अपार्टमेंटसमोरील रॅडिसन ब्ल्यू रोड परिसरात सुरू असलेल्या बांधकामस्थळावरून संध्याकाळी दैनंदिन काम आटोपल्यानंतर शिल्लक बांधकाम साहित्य नेले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

saman 
 
 
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, साइटवरील गट्टू, रेती आदी साहित्य काही व्यक्ती वाहनांमध्ये भरून नेत असल्याचे दिसून आले. या प्रकाराचे छायाचित्रही उपलब्ध झाले असून, संबंधित साहित्य कोणाच्या परवानगीने नेले जात आहे, तसेच यासाठी जबाबदार कोण, याबाबत स्पष्टता नाही.Radisson Blu Road,या घटनेमुळे बांधकाम साहित्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित कंत्राटदार किंवा जबाबदार यंत्रणेने याची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
सौजन्य : आशिष घाटे,संपर्क मित्र