एसआयआर कामासाठी बीएलओ शिक्षकांना कार्यमुक्त करा

जिल्हाधिकार्‍यांकडे तहसीलदारामार्फत निवेदन

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
मानोरा,
relieve blo teachers एसआयआर मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ शिक्षकांना सदर कामाच्या कालावधीत शाळेच्या नियमित कामकाजातून कार्यमुक्त करण्यात यावे, तसेच एसआरआर कामासाठी दिलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी बीएलओ शिक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तहसीलदारामार्फत सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
relieve blo teachers
 
निवेदनात म्हटले आहे की, एसआयआर चे काम अत्यंत लिष्ट, व्यापक व वेळखाऊ आहे. या कामासोबत शाळेतील अध्यापन, प्रशासकीय कामकाज आणि इतर शालेय जबाबदार्‍या सांभाळणे अत्यंत कठीण होत आहे. शासनाने निश्चित करून दिलेल्या कालमर्यादेत शालेय कामकाज व एसआयआर ची जबाबदारी एकाच वेळी पूर्ण करणे व्यवहार्य नसल्याचे शिक्षकांनी नमूद केले आहे. त्यामुळे एसआरआय मोहिमेचा कालावधी संपेपर्यंत बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना शाळेतून तात्पुरते कार्यमुक्त करण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन एसआयआर साठी निश्चित करण्यात आलेल्या मुदतीत वाढ करावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
 
या मागणीमुळे बीएलओ शिक्षकांना दिलासा मिळण्याबरोबरच एस. आय. आर.चे काम अधिक प्रभावी व अचूकपणे पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. निवेदनावर प्राथमिक शिक्षक कृती समिती समन्व्यक समिती तालुका अध्यक्ष प्रवीण म्हातारमारे, विजेश पवार, संजय भवाळ, दिलीप अंबोरे, बालाजी पाताटे, गणेश जाधव, विनोद नांदे, गोपाल तडसे, उमेश हाके, गणेश हजारे, संदीप सावळे, शशांक देशमुख, छगन गोतरकर आदी च्या स्वाक्षरी आहे.