मुंबई,
Sachin Ahir joins the Shinde महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून विधान परिषद उपसभापती निवडणुकीत अनपेक्षित वळण आले आहे. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या गटाविरुद्ध पुन्हा एकदा राजकीय आघाडी उघडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ठाकरे गटातील विश्वासू मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.या निर्णयामुळे विधान परिषद उपसभापती निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.