नागपूर,
Saint Shiromani Kabir ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त संत शिरोमणी सद्गुरु कबीर साहेब यांच्या प्रकट उत्सवानिमित्त नागपूरमध्ये कबीरपंथीय भक्तांतर्फे विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.सेमिनरी हिल्स परिसरातील झोपडपट्टी भागात गरजू कुटुंबांना नवीन वस्त्रांचे वाटप करण्यात आले. महिला, पुरुष व बालकांना नवीन कपड्यांसह महाप्रसाद देण्यात आला. झाशी राणी चौक येथे सलग पाचव्या वर्षी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक, नागरिक आणि प्रवाशांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी संत कबीर साहेब यांच्या विचारांवर आधारित 'कबीर अमृतवाणी' या पुस्तकाचेही निःशुल्क वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात सद्गुरु कबीर साहेब यांच्या सत्य, प्रेम, समता, करुणा, सदाचार आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला.Saint Shiromani Kabir सेवा व जनकल्याणाच्या माध्यमातून सामाजिक समरसता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश आयोजकांनी दिला.कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. पंकज धापके, देवेंद्र जैसवाल, सौरभ भजन, डॉ. लखेश चंद्रवंशी, दिनेश महंत, शंतनू भजन, राकेश धमदे तसेच कबीरपंथीय महिला मंडळ व युवक-युवतींचे विशेष योगदान लाभले.प्रमुख पाहुणे म्हणून नरेशभाऊ बरडे, स्वानंद धवड, रमेश कालमेघ यांच्यासह अनेक मान्यवर आणि कबीरपंथीय भक्त उपस्थित होते.
सौजन्य:लखेश चंद्रवंशी ,संपर्क मित्र